esakal | वारीस पठाण यांनी आपले शब्द घेतले मागे, माफी मात्र मागितली नाहीच...
sakal

बोलून बातमी शोधा

वारीस पठाण यांनी आपले शब्द घेतले मागे, माफी मात्र मागितली नाहीच...

वारीस पठाण यांनी आपले शब्द घेतले मागे, माफी मात्र मागितली नाहीच...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - गुलबर्गामध्ये एका कार्यक्रमात, "१०० कोटींवर १५ कोटी मुस्लिम भारी पडू" असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातून AIMIM चे मुंबई भायखळ्यातील माजी आमदार आणि नेते वारीस पठाण यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. त्यांना  देशभरातून मोठ्या रोषाचा सामना करावा लागला. यानंतर आपल्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो, या पार्श्वभूमीवर वारीस पठाण यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आपण केलेलं विधान मागे घेत असल्याचं म्हटलंय.

मोठी बातमी - दोन महिन्यांपूर्वीच त्या कुटुंबानं सगळं संपवलं होतं, घरमालक भाडं घ्यायला आले तेंव्हा सगळं समजलं...

वारीस पठाण यांनी आपलं विधान मागे जरी घेतलं असलं तरीही त्यांनी गुलबर्गा मधील सभेत केलेल्या विधानाचा पश्चाताप होतोय किंवा 'मी माफी मागतो' असं कोणतंही वक्तव्य पत्रकार परिषदेत केलेलं नाही. आमच्यासाठी हा विषय इथे संपला, माध्यमांनी हा विषय किती चालवायचा हे त्यांनी ठरवावं, असं AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. 

या पूर्वीही वारीस पठाण यांनी आपलं वक्तव्य चुकीचं नसल्याचं म्हटलं होतं, आता कडाडून टीका झाल्यानंतर वारीस पठाण यांनी आपले शब्द मागे घेतलेत. 

मोठी बातमी - सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत...

काय म्हणालेत वारीस पठाण ? 

"सर्वधर्म समभाव ही या देशाची खासियत आहे. आपल्यात आपापसात काही मुद्द्यांवर मतमतांतरं मतं असू शकतात आणि लोकशाहीत असं असायला असायलाही हवं. याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरायच्या संविधानाने दिलाय. मी पुन्हा एकदा स्पष्ट करी इच्छितो की मी असं कोणताही वक्तव्य केलेलं नाही, ज्याचा वेगळा अर्थ काढून मला निशाणा बनवलं जातंय. यामध्ये केवळ राजकीय षडयंत्रातून मला आणि माझ्या पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. तरीही माझ्या कुठल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो. मी या देशाचा एक सच्चा नागरिक आहे आणि मला मी भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद," असं वारीस पठाण म्हणालेत.

वारीस पठाण यांनी मुंबईतील वांद्रे भागात पत्रकार परिषद घेत आपलं विधान मागे घेतलंय.  

AIMIM leader waris pathan takes his words back but did not apologies