esakal | कर्नाटकच्या राजकारणात भूकंप; काँग्रेस-जेडीएस युती संपुष्टात, आसामातही 'डेमोक्रॅटिक'ला सोडचिठ्ठी I Karnataka
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka
राजकारणात मोठी खळबळ उडाली असून गेल्या काही वर्षांपासून एकत्र असलेली काँग्रेस-जेडीएस युती संपुष्टात आलीय.

कर्नाटकच्या राजकारणात भूकंप; काँग्रेस-जेडीएस युती संपुष्टात

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Karnataka Political : कर्नाटकच्या राजकारणात (Karnataka Political) मोठी खळबळ उडाली असून गेल्या काही वर्षांपासून एकत्र असलेली जोडगोळी काँग्रेस आणि जेडीएस (Congress and JDS) युती संपुष्टात आलीय. त्यामुळं कर्नाटकातील राजकारणाला आता वेगळं वळण लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या युतीबाबत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी माहिती दिलीय. ही युती तुटल्याने भविष्यात हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुका स्वतंत्र्यपणे लढतील हे स्पष्ट झालंय. कर्नाटकात मे 2023 मध्ये निवडणुका होणार असून जेडीएस स्वबळावर निवडणूक लढवते की, भाजपसोबत हातमिळवणी करते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

काँग्रेस-जेडीएसची ही युती केवळ कर्नाटकातच नाही, तर आसाममध्ये देखील कॉंग्रेसनं सहयोगी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटसोबतची युती तोडलीय. बिहारमध्येही त्यांनी दोन जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत राजदसमोर आपले उमेदवार उभे केले आहेत. काही दिवसांपूर्वी जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पडण्याला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या दोघांच आरोप-प्रत्यारोप सुरु होते.

हेही वाचा: मी चालत फिरीन नाहीतर लोळत फिरीन, तुम्हाला त्याचं काय?

कुमारस्वामी यांनी आपल्या आरोपात सिद्धरामय्या यांना विरोधी पक्षनेते व्हायचे होते, म्हणून त्यांनी काँग्रेस-जेडीएस युतीचं सरकार पाडलं, असा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार यांनी, पडद्यामागे गेलेल्या प्रकरणाबद्दल मला बोलायचं नाही, असं म्हटलं होतं. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्यानंतरही भाजपला सरकार बनवता आलं नव्हतं. मात्र, काँग्रेसनं जेडीएसच्या मदतीनं सरकार स्थापन केलं होतं. काँग्रेसला 80 तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. पण, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीशी तडजोड करावी लागली होती.

हेही वाचा: PHOTO : भारताचं 'स्कॉटलंड' माहितीय? मग, तुम्हाला कर्नाटकात जावचं लागेल

loading image
go to top