कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी?

Pralhad Joshi
Pralhad Joshiesakal

बंगळूर : सध्या कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रीपदाचा काल (सोमवारी) राजीनामा दिल्यानंतर, मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. बीएस येडियुरप्पा हे स्वतः लिंगायत समुदायातून येतात. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्रीही लिंगायत समुदायातील असणार का? याकडेही सर्वांच्या नजरा आहेत. भाजपचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्षही लिंगायत समुदायातील आहेत. त्यामुळे येडियुरप्पा यांनी पुढचा मुख्यमंत्री त्याच समुदायातील नको, असं स्पष्ट सांगितलंय, त्यामुळे भाजपचे हायकमांड कोणता निर्णय घेणार हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Karnataka Political News New Chief Minister Of Karnataka Will Be Sworn In Tomorrow bam92)

Summary

येडियुराप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत.

सध्या भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची निवड झाली असून उद्या बुधवारी सायंकाळपर्यंत शपथ घेणार असल्याचे समजते. त्यामुळे कर्नाटकचा पुढचा नवा मुख्यमंत्री कोण? हे आज सायंकाळपर्यंत समजणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमाणवचनानंतर एका आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. येडियुराप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत.

Pralhad Joshi
'त्या हिंसाचारात पुण्याचे निंबाळकर जखमी

कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून मुख्य तीन नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यात केंद्रातील मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या प्रल्हाद जोशींच्या (Pralhad Joshi) नावाची सर्वाधिक चर्चा आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून ते उत्तर कर्नाटकचे खासदार (धारवाड) आहेत. शिवाय, बीएल संतोष यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. तसेच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचंही नाव मुख्यत्वे चर्चेत आहे. या तीन नावांखेरीज भाजप नेते मुर्गेश निराणी आणि बसवराज यत्नाळ यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आघाडीवर आहेत.

Karnataka Political News New Chief Minister Of Karnataka Will Be Sworn In Tomorrow bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com