Karnataka Politics
esakal
कर्नाटकमध्ये डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बदल निश्चित – आर. अशोक
ऑपरेशन कमळ पुन्हा राबविण्याचा भाजपचा विचार नाही
बेळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भाजप पथकाची भेट
बेळगाव : डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यातील मुख्यमंत्री बदलणार (Karnataka Politics Update) हे नक्की असल्याचे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक (R Ashoka) यांनी शुक्रवारी (ता. ३) बेळगावात केले. राज्यात पुन्हा ऑपरेशन कमळ राबविण्याचा विचार नाही. पुढील विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.