Satish Jarkiholi : कर्नाटकातील राजकारणाला वेगळं वळण; सिद्धरामय्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? काँग्रेस हायकमांड घेणार अंतिम निर्णय!

दलितांसह सर्व समुदायांकडून मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी आहे.
Karnataka Politics Satish Jarkiholi
Karnataka Politics Satish Jarkiholiesakal
Summary

पक्ष आणि सरकारमधील काही घडामोडींवर नाराज असलेले जारकीहोळी यांनी ५० माजी आणि विद्यमान आमदारांसह दुबईच्या सहलीची योजना आखली होती.

बंगळूर : दलितांसह सर्व समुदायांकडून मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी आहे, परंतु काँग्रेस हायकमांडला (Congress High Command) यावर अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी सोमवारी सांगितले. त्यांनी जातनिहाय जणगणना, आमदारांचा विदेश दौरा यासह विविध प्रश्नाना त्यांनी उत्तरे दिली.

Karnataka Politics Satish Jarkiholi
मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच सिद्धरामय्यांची मंत्री-आमदारांना सक्त सूचना; म्हणाले, आमच्यात कोणतेही मतभेद..

ते म्हणाले, ‘‘२०१३ मध्येही दलित मुख्यमंत्र्यांची मागणी होती. हा मुद्दा वारंवार मांडला गेला आहे. २००८ मध्ये देखील मल्लिकार्जुन खर्गे यांनाही संधी मिळाली नाही. गृहमंत्री जी. परमेश्वर आठ वर्षे पक्षाचे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि उपमुख्यमंत्री झाले, पण त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही.’’

Karnataka Politics Satish Jarkiholi
Gram Panchayat Results : कोल्हापुरात 29 ग्रामपंचायतींत सत्तांतर; 'इतक्या' ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी मारली बाजी, नेत्यांच्या गटांची काय अवस्था?

सरकारच्या अडीच वर्षानंतर असे होऊ शकते का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘ते आमच्या हातात नाही. हायकमांड, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांचा त्यांच्या पातळीवर निर्णय घेतात. मी सांगू शकत नाही.’’ परमेश्वर यांच्या निवासस्थानी नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, जारकीहोळी आणि मंत्री एच. सी. महादेवप्पा यांची उपस्थिती होती, अशी अफवा पसरली होती की, परमेश्वर मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत असू शकतात.

मुख्यमंत्री बदलाबाबत काँग्रेसअंतर्गत दावे-प्रतिदावे होत असताना या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री व्हावे, या वाल्मिकी गुरुपिता स्वामी प्रसन्नानंद स्वामीजींच्या मागणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री म्हणाले, ‘‘स्वामीजी हे सुरुवातीपासूनच सांगत आहेत. तो जुना मुद्दा आहे, नवीन काही नाही. दलित, लिंगायत, वक्कलिग समाजाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी सर्व समाजाकडून मागणी आहे.

Karnataka Politics Satish Jarkiholi
Gram Panchayat Results : सांगलीत महाविकास आघाडीला 38, महायुतीला 33 गावांत सत्ता; खासदार पाटील, गोपीचंद पडळकरांच्या गटांची काय अवस्था?

त्यात विशेष काही नाही. पक्ष आणि सरकारमधील काही घडामोडींवर नाराज असलेले जारकीहोळी यांनी ५० माजी आणि विद्यमान आमदारांसह दुबईच्या सहलीची योजना आखली होती. जी आता हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर स्थगित केल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com