Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 'इतक्या' जागा जिंकणार; मंत्री जारकीहोळींचा मोठा दावा

बेळगावातून लिंगायत समाजाला तर चिक्कोडीतून धनगर समाजाला उमेदवारीसाठी प्राधान्य देण्याचा विचार आहे.
Congress leader Satish Jarkiholi
Congress leader Satish Jarkiholiesakal
Summary

आतापर्यंत राज्यातील कोणत्याही मंत्र्याला लोकसभेचे उमेदवार म्हणून तयार राहा, अशी सूचना करण्यात आलेली नाही.

बेळगाव : राज्यातून लोकसभेसाठी (Loksabha Election) २० जागांवर विजय मिळविण्याचे काँग्रेस पक्षाचे उद्दिष्ट आहे. बेळगावातून लिंगायत समाजाला तर चिक्कोडीतून धनगर समाजाला उमेदवारीसाठी प्राधान्य देण्याचा विचार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी दिली. येथील काँग्रेस भवनात सोमवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांनी त्या अनुषंगाने कामाला लागावे. उमेदवार ठरविण्यासाठी तीन फेऱ्यांमध्ये चर्चा होईल. त्यानंतर संभाव्य उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येईल. आतापर्यंत राज्यातील कोणत्याही मंत्र्याला लोकसभेचे उमेदवार म्हणून तयार राहा, अशी सूचना करण्यात आलेली नाही.

Congress leader Satish Jarkiholi
Raju Shetti : ..म्हणून ते ED च्या भीतीने इकडे-तिकडे उंदरासारखे पळत सुटलेत; राजू शेट्टींचा कोणावर निशाणा?

उमेदवार ठरविण्यापूर्वी इच्छुकांकडून निःशुल्क अर्ज मागविण्यात येतील. लोकसभेसाठी आपण इच्छुक आहोत, असे राहुल जारकीहोळी असोत किंवा मृणाल हेब्बाळकर यांनी कोठेही म्हटलेले नाही, असेही पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले. एच. डी. कुमारस्वामी हे विरोधी पक्षातील नेते असून सत्ताधाऱ्यांविरोधात बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. तुम्ही काहीच बोलू नका, असे आम्ही कुमारस्वामी यांना सांगू शकत नाही, असे एका प्रश्‍नावर पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले.

काँग्रेसने जनतेसाठी अनेक योजना आणल्या, पण त्याचा कधीही गवागवा केला नाही. जात जनगणतीबाबत कोणाचा आक्षेप असेल, तर सभागृहात बोलावे. समाजात बोलून त्यावर पर्याय निघणार नाही. बेळगाव महापालिकेत भाजप नगरसेवकांना खुलेपणाने कामे करण्यास त्यांचे नेते संधी देत नाहीत. त्यामुळे महापालिकेत भाजप नगरसेवक वारंवार बैठका घेत असतात.

Congress leader Satish Jarkiholi
अजितदादांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' आमदारानं अचानक घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

बेळगावच्या जनतेने भाजपच्या हाती अधिकार दिला, त्याचे आम्हाला वैषम्य वाटत नाही. आम्ही ऑपरेशन हस्त राबविणार नाही, असेही पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.

Congress leader Satish Jarkiholi
काँग्रेस नेते, मंत्र्यांना सत्तेचा माज चढलाय; भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा पहिल्याच भाषणात काँग्रेसवर घणाघात

कायदा-सुव्यवस्था सुस्थितीत

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली नसून ती सुस्थितीत आहे. काही तरुण गट तयार करून अवैध कृत्ये करीत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. याला पोलिस खात्याला पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही. पोलिसांच्या निदर्शनास अवैध प्रकार आल्यास ते गुन्हेगारीला आवर घालण्याचा प्रयत्न करीत असतातच. मात्र, अचानक अवैध घटना घडल्यास त्याला पोलिस खाते काही करु शकत नाही, असेही पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com