Karnataka Politics
esakal
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जी. परमेश्वर यांनी ठामपणे फेटाळले
सिद्धरामय्या पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याची खात्री व्यक्त
माध्यमांनी शांत राहावे, अन्यथा गोंधळ वाढतो – परमेश्वर यांचा सल्ला
बंगळूर : राज्यामध्ये या वर्षअखेरीस मुख्यमंत्री (Karnataka Politics) बदल होणार असल्याच्या चर्चांना गृहमंत्री जी. परमेश्वर (G. Parameshwara) यांनी सोमवारी ठामपणे फेटाळून लावले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या CM Siddaramaiah) पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.