Congress Leader Siddaramaiah
Congress Leader Siddaramaiahesakal

CM Siddaramaiah : 'मी आयुष्याच्या शेवटपर्यंत भाजपमध्ये कधीच जाणार नाही'; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

भाजपमध्ये जाईन यावर कोणाचा विश्वास बसेल का?
Published on
Summary

आम्ही काही भाजप नेत्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत भेटलो असेनही. याचा अर्थ त्यांच्या पक्षात जाईन असे होत नाही.

बंगळूर : आयुष्याच्या शेवटपर्यंत भाजपमध्ये (BJP) जाणार नाही, असे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी आज स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द जातीयवादी शक्तींविरोधात गेली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे याबाबतीतचे विधान मजेदार आहे.’’

Congress Leader Siddaramaiah
Chandrakant Patil : लोकसभा निवडणुकीत NDA च्या 325 पेक्षा जास्त जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटलांना विश्वास

सिद्धरामय्या यांना एकदा भाजपमध्ये जायचे होते आणि या संदर्भात त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली होती, या कुमारस्वामींच्या (H. D. Kumaraswamy) विधानावर ते प्रतिक्रिया देत होते. म्हैसूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘भाजपमध्ये जाईन यावर कोणाचा विश्वास बसेल का? आम्ही काही भाजप नेत्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत भेटलो असेनही. याचा अर्थ त्यांच्या पक्षात जाईन असे होत नाही.

Congress Leader Siddaramaiah
Maratha Reservation : PM मोदीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, कारण..; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

नुकतीच मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यापूर्वी मी लालकृष्ण अडवाणींनाही भेटलो होतो.’’ सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘पुढील मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली जाईल. ६२ तालुके आधीच निकषांनुसार घोषणेसाठी पात्र आहेत. आणखी १३६ तालुकेही दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. आम्ही अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com