Loksabha Election : निवडणुकीआधीच भाजप-धजद युती तुटणार? काही आमदार उघडपणे विरोधात, दोन्ही पक्षांत दरी निर्माण होण्याची शक्यता

भाजप-धजद (BJP-JDS Alliance) यांच्यातील युतीला पक्षाअंतर्गत तीव्र विरोध होत आहे.
BJP-JDS Alliance
BJP-JDS Allianceesakal
Summary

भाजप आणि धजद यांच्यातील युतीला भाजप आणि धजदच्या काही आमदारांचा विरोध होत आहे.

बंगळूर : भिन्न विचारसरणीचे दोन पक्ष असलेल्या भाजप-धजद (BJP-JDS Alliance) यांच्यातील युतीला पक्षाअंतर्गत तीव्र विरोध होत आहे. काही आमदार उघडपणे विरोध करत आहेत, तर काही मतभेद नोंदवत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यावर हे मतभेद निर्माण झाल्याने युतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिणामी, दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. भाजप आणि धजद यांच्यातील युतीला भाजप आणि धजदच्या काही आमदारांचा विरोध होत आहे. धजदच्या आमदार करेम्मा नाईक यांनी या आघाडीला विरोध दर्शवला आहे.

BJP-JDS Alliance
Hasan Mushrif : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यात 'त्या' माणसाची अडचण असेल, तर माझा नाईलाज आहे; मुश्रीफांचा कोणावर रोख?

या विरोधामागे भाजप नेत्यांशी स्थानिक मतभेद हे प्रमुख कारण आहे. स्थानिक भाजप नेत्यांशी भांडण झाल्याने युतीच्या निर्णयाने त्यांची कोंडी झाली आहे. याशिवाय नाईक यांच्या देवदुर्ग मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या मतांचाही त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे.

BJP-JDS Alliance
Almatti Dam : 'आलमट्टी'ची उंची वाढल्यास पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका; कर्नाटक सरकारच्या 'त्या' निर्णयाला तीव्र विरोध

एस. टी. सोमशेखरांचा विरोध

विशेषत: माजी मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी या युतीला वैयक्तिक विरोध नोंदवला आहे. आपण मतदारसंघात धजदविरोधात राजकीय संघर्ष केला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांमधील युतीच्या विरोधात आहोत, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि धजद आघाडीबाबतीत केवळ नेत्यांमध्ये मतभेद नव्हते. तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र मतभेद होते. नेते एकत्र असले तरी कार्यकर्त्यांची एकजूट होणे कठीण आहे. आघाडीसाठी सर्वोच्च पातळीवरील नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. मात्र तळागाळात पक्षहितासाठी एकमेकांबद्दल वैमनस्य वाटणारे कार्यकर्ते युतीला विरोध करत आहेत.

BJP-JDS Alliance
महाराष्ट्रात लोकसभेत 45 खासदार अन् विधानसभेत 225 आमदार निवडून येतील; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

आमदार कंडकूरांचाही विरोध

धजदचे आणखी एक आमदार शरणगौडा कंडकूर यांनीही या आघाडीला विरोध दर्शवला आहे. मतदारसंघातील अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी युतीला विरोध केला. मैदानात युती झाली की आपल्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न येतो. हा प्रश्न आम्हा सर्व नेत्यांना सतावत असल्याची नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com