बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा दावा केल्यानंतर या पदाचे प्रमुख दावेदार असलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (Deputy CM DK Shivakumar) यांनी त्यांना यावर कोणताही आक्षेप नाही आणि ते मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला काँग्रेस हायकमांडच्या (Congress High Command) निर्देशांचे समर्थन करावे लागेल आणि मी त्यांचे पालन करेन, असे बुधवारी स्पष्ट केले.