24 वर्षात भारताला इस्लामिक देश बनवण्याचा कट; NIA च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा I Nettaru Murder Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nettaru Murder Case

प्रवीण नेत्तारू खून प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) करत असून आतापर्यंत या हत्याकांडात अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत.

Nettaru Murder Case : 24 वर्षात भारताला इस्लामिक देश बनवण्याचा कट; NIA च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

Nettaru Murder Case : एनआयएनं (NIA) कर्नाटकातील प्रवीण नेत्तारू हत्याकांडात (Karnataka Praveen Nettaru Murder Case) आरोपपत्र दाखल केलं असून 20 आरोपींना अटक केलीये.

विशेष म्हणजे, 26 जुलै 2022 रोजी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांची दक्षिण कन्नड येथील बेल्लारे इथं त्यांच्याच दुकानासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही दुचाकीस्वारांनी प्रवीण नेत्तारू यांच्यावर चाकूनं हल्ला केला.

हेही वाचा: Tejas Shinde Resigns : आमदार शिंदेंच्या मुलाचा NCP जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा; राजकीय चर्चांना उधाण

प्रवीण नेत्तारू खून प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) करत असून आतापर्यंत या हत्याकांडात अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, प्रवीण नेत्तारू हत्या प्रकरणामागं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (Popular Front of India PFI) हात होता. या प्रकरणातील फरार आरोपींवर तपास यंत्रणेनं बक्षीसही जाहीर केलं आहे. पीएफआय पुढील 24 वर्षे म्हणजे 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश (Islamic Countries) बनवण्याचा कट रचत असल्याचं तपासात समोर आलंय.

हेही वाचा: Britain Police : पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई; कारण जाणून तुम्हीही सावध व्हाल!

एनआयएनं आरोपपत्रात म्हटलंय की, 'पीएफआय दहशत पसरवणं, जातीय द्वेष आणि अशांतता निर्माण करण्याच्या अजेंडाचा एक भाग म्हणून, भारताला 2047 पर्यंत इस्लामिक देश बनवण्याचा कट रचत आहे. त्यांनी किलर स्क्वॉड नावाच्या गुप्त पथकांची स्थापना केली आहे.'

हेही वाचा: Narendra Modi : युक्रेन-रशिया युध्दात PM मोदीच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात; फ्रेंच पत्रकाराचं मोठं विधान

एनआयएनं नुकतेच प्रवीण नेत्तारू खून प्रकरणातील दोन आरोपींवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. दोन आरोपींमध्ये मोहम्मद शरीफ (53) आणि मसूद (40) यांचा समावेश आहे. हे दोघंही बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेचे सदस्य आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये एनआयएनं 4 संशयितांना अटक केली आहे.

टॅग्स :KarnatakaNIA