Karnataka RSS Event
esakal
आरएसएस मिरवणुकीत सहभाग घेतल्याने पीडीओवर कारवाई करण्यात आली.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागावरून राज्यात राजकीय वाद सुरू आहे.
निलंबनामुळे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
बंगळूर : सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्याक्रमावर कारवाई आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागावरून राज्यात (Karnataka Government) मोठा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या मिरवणुकीत सहभागी लिंगसुगूर तालुक्यातील पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) प्रवीणकुमार याला निलंबित करण्यात आले आहे.