Video : अन् विद्यार्थ्यांनी पाडली बाबरी मशीद; शाळेवर टीकेचा भडीमार

वृत्तसंस्था
Wednesday, 18 December 2019

बंगळूर : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघचलित एका खासगी शाळेत लहान विद्यार्थ्यांकडून चक्क बाबरी मशीद पाडण्याचे प्रात्यक्षिक साकारण्यात आले. या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशा घटनांचे लाहान मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेणे हे अत्यंत अयोग्य आहे, अशा प्रकारची टीका या शाळेवर होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मँगलोरजवळील श्रीराम विद्याकेंद्र येथे रविवारी संध्याकाळी क्रीडोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात काही लहान मुलांनी पांढऱ्या व भगव्या रंगांचे कपडे घातले होते. समोर बाबरी मशीदीचे पोस्टर लावण्यात आले होते. ही सर्व मुले श्री रामचंद्र की जय, भारतमाता की जय अशा घोषणा देत होती. त्यांनी बाबरी मशीदीच्या पोस्टरकडे धाव घेतली आणि ती पाडली. त्यानंतर त्यांनी बजरंगबली की जय अशाही घोषणा दिल्या. या सर्व प्रकारामुळे 1992मध्ये घडलेल्या त्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची आठवण उपस्थितांना झाली. तर संस्थाचालकांनी असे प्रात्यक्षिक करण्यात काहीही गैर नाही असे सांगितले. 

आता अक्षय कुमारही देतोय अमित शहांना सल्ले!

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सदानंद गौडा व पाँडीचेरीच्या राज्यपाल किरण बेदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ही शाळा कल्लडका प्रभाकर भट ट्रस्टकडून चालवण्यात येते. ही संस्था आरएसएस प्रभावित आहे. किरण बेदी यांनी या विद्यार्थ्यांचा राम मंदिराच्या आकारात बसलेली व्हिडिओही ट्विट केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka School Makes Students Re enact Babri Masjid Demolition