Karnataka: भाजपला धक्का देत काँग्रेस बदलणार दोन मोठे निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत सिद्धरामय्या सरकार विधेयक मांडणार

Karnataka
Karnatakaesakal
Updated on

बंगळूर: कर्नाटकमध्ये नुकत्याच सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये, कर्नाटकमध्ये २०२२मध्ये भाजप सरकारने आणलेला धर्मांतर बंदी कायदा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनामध्ये याबाबचे विधेयक सरकार कडून मांडण्यात येणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.

तीन जुलै रोजी सुरु होणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबत विधेयक आणण्यात येण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला, अशी माहिती कर्नाटकचे कायदा आणि विधिमंडळ कामकाजमंत्री एच. के. पाटील यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान, कर्नाटकातील शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यावरील धडा वगळण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

Karnataka
Nagpur Crime : ती स्वप्नात येते, मला बोलाविते; ‘बेस्टफ्रेन्ड’च्या आत्महत्येनंतर तरुणीचा टाेकाचा निर्णय

कर्नाटकमध्ये २०२२मध्ये ‘कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य आणि संरक्षण कायदा (धर्मांतर बंदी कायदा) तत्कालीन भाजप सरकारने लागू केला होता. या कायद्याला काँग्रेससह तेव्हाच्या अन्य काही विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता.

या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीचे किंवा समूहाचे बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याबाबत तरतूद करण्यात आली होती. तसेच धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आधीच्या धर्मातील त्याच्या वर्गाला देण्यात येणाऱ्या आरक्षणासारख्या सुविधा मिळणार नाहीत.

मात्र तो ज्या धर्मामध्ये प्रवेश करत आहे, त्या धर्मातील व्यक्तींसाठी सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा त्याला लाभ मिळू शकतो, असे तत्कालीन गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी सांगितले होते.

Karnataka
Best Friend: 'ती स्वप्नात येते, मला बोलाविते'! 'बेस्टफ्रेन्ड'च्या आत्महत्येनंतर तरुणीचा टाेकाचा निर्णय

कायद्यातील प्रमुख तरतुदी

कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, छळाने अथवा आमिष दाखवून धर्मांतर करणे गुन्हा.

कायद्याचे उल्लंघन केल्यास तीन ते पाच वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंड.

अल्पवयीन नागरिक, महिला अनुसूचित जाती-जमातीमधील व्यक्ती यांचे बळजबरी धर्मांतर केल्यास तीन ते दहा वर्षांपर्यंत शिक्षा आणि कमीतकमी ५० हजार रुपये दंड.

आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला, पीडिताला पाच लाखांपर्यंत भरपाई द्यावी लागणार.

सामूहिक धर्मांतर करणाऱ्यास, तीन ते दहा वर्षांपर्यंत शिक्षा व एक लाख रुपये दंड.

या कायद्याअंतर्गत गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com