Karnataka Vidhansabha : सख्ख्या भावंडांचा एकमेकांविरुद्ध ‘शड्डू’

सोरब विधानसभा मतदारसंघात मोठ्या भावाविरुद्ध लहान भावाने शड्डू ठोकला आहे. भाजपने कुमार बंगाराप्पा यांना उमेदवारी दिली आहे.
Madhu Bangarappa and Kumar Bangarappa
Madhu Bangarappa and Kumar Bangarappasakal
Summary

सोरब विधानसभा मतदारसंघात मोठ्या भावाविरुद्ध लहान भावाने शड्डू ठोकला आहे. भाजपने कुमार बंगाराप्पा यांना उमेदवारी दिली आहे.

सोरब विधानसभा मतदारसंघात मोठ्या भावाविरुद्ध लहान भावाने शड्डू ठोकला आहे. भाजपने कुमार बंगाराप्पा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस उमेदवारीवर त्यांचे बंधू मधू बंगाराप्पा यांना आखाड्यात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे सख्खी भावंडे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारीवर समोरासमोर ठाकली आहेत. यामुळे सोरब मतदारसंघातील लढत राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यामध्ये २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोरब मतदार संघातून भाजप उमेदवार कुमार भंगारप्पा यांनी बाजी मारली. यामुळे या निवडणुकीत पक्षाने परत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कॉंग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे लक्ष लागून होते. अंतिम टप्प्यात कॉंग्रेसतर्फे कुमार बंगाराप्पा यांचे बंधू मधु बंगाराप्पा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे सख्खी भावंडे सोरब संघात समोरासमोर ठाकली आहेत.

सोरब मतदारसंघातून भावंडे पहिल्यांदा समोरासमोर ठाकले नाहीत, तर यापूर्वी त्यांच्यात लढत झाली आहे. त्यात २०१३ मध्ये केवळ एकदा मधू बंगारप्पा यांनी येथून विजय मिळविला आहे. कुमार बंगाराप्पा एका पक्षात राहिले आहे तर त्यांचे कुटुंब हे बंधू मधू बंगारप्पा यांच्यासोबत राहिले आहे. कुमार बंगारप्पा १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस पक्षात होते. मात्र, २०१८ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकली. यामुळे दुसऱ्यांदा भाजपच्या उमेदवारीवर कुमार बंगाराप्पा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात मधू बंगाराप्पा कॉंग्रेस उमेदवारीवर आखाड्यात आहेत.

एस. बंगाराप्पा लोकप्रिय नेते

एस. बंगाराप्पा यांनी राजकीय वर्तुळात आपला ठसा उमटविला होता. आमदार, मंत्री, मुख्यमंत्रिपद भूषविले. ४० वर्षे राजकीय वर्तुळात चर्चेत राहिले. त्यामुळेच सोरब विधानसभा मतदारसंघाचे नाव घेण्यात आल्यावर माजी मुख्यमंत्री एस. बंगाराप्पा यांचे स्मरण होते. त्यांची मुले कुमार बंगाराप्पा व मधू बंगाराप्पा गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारीवर आखाड्यात आहेत.

उमेदवारी अर्जाबाबत

  • दाखल अर्ज - १८

  • वैध अर्ज - १८

  • अर्ज माघार - ८

  • रिंगणातील अर्ज - १०

भावंडात चुरशीची लढत

भावंडामध्ये सतत चुरशीच्या लढती झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही ते दोघे अमोरासमोर होते. २०१८ मध्ये एकमेकाच्या विरोधात लढले. यंदाही तशीच लढत आहे. यामुळे भावंडातील राजकीय इर्षा शिगेला पोचली आहे. मधू भंगारप्पा यांची राजकारण आणि समाजसेवेसोबतच चित्रपटसृष्टीतही ओळख आहे. चित्रपट निर्मितीसोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटानंतर राजकारणाकडे पूर्ण लक्ष देणाऱ्या मधु यांचा राजकीय मार्ग आव्हानात्मक ठरला आहे.

मधू बंगाराप्पा ३,२८६ मतांनी पराभूत

राज्यात २०१८ मध्ये मधू बंगारप्पा यांनी विधानसभा निवडणुकीत धजदचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पण त्यात भाऊ कुमार बंगारप्पा यांच्याविरुद्ध पराभव झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी शिमोगा मतदारसंघातून काँग्रेस-धजद आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व तेथेही त्यांचा पराभव झाला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कुमार बंगारप्पा यांनी मधु बंगारप्पा यांचा ३,२८६ मतांनी पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com