Karnataka Teacher Recruitment
esakal
बंगळूर : सरकारी आणि अनुदानित शाळांमधील १८,५०० शिक्षकांच्या भरतीची (Karnataka Teacher Recruitment) प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे शालेय शिक्षण आणि साक्षरतामंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले. चामराजनगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘आमचे सरकार सत्तेत आल्यापासून आम्ही १३,५०० शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, भाजप सरकारच्या काळात फक्त ५,४२८ शिक्षकांची नियुक्ती (Government Jobs) करण्यात आली.’