तुमकुर (कर्नाटक) : राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर (Home Minister Dr. G. Parameshwar) यांच्या गावी (Tumkur Case) एक अघोरी आणि धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एका व्यक्तीचा निर्घृण खून करून मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून कचऱ्यासारखे रस्त्यावर फेकण्यात आले.