Rahul Gandhi : कर्नाटक निवडणुकीत भाजपला ४० जागांवर रोखा

कर्नाटकात ‘४० टक्के भ्रष्टाचारा’त गुंतलेल्या भाजपला केवळ ४० जागा मिळतील. याची खात्री भाजपने करून घ्यावी. तर काँग्रेसला किमान १५० जागा मिळतील.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Summary

कर्नाटकात ‘४० टक्के भ्रष्टाचारा’त गुंतलेल्या भाजपला केवळ ४० जागा मिळतील. याची खात्री भाजपने करून घ्यावी. तर काँग्रेसला किमान १५० जागा मिळतील.

बंगळूर - कर्नाटकात ‘४० टक्के भ्रष्टाचारा’त गुंतलेल्या भाजपला केवळ ४० जागा मिळतील. याची खात्री भाजपने करून घ्यावी. तर काँग्रेसला किमान १५० जागा मिळतील. ते (भाजप) आमदार विकत घेणार नाहीत आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडणार नाहीत, अशी आपण आशा करुया, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी मारला. तुमकूर जिल्ह्यात जाहीरसभेला ते मार्गदर्शन करत होते.

पंतप्रधानांना ९१ वेळा शिवीगाळ करण्यात आली, या आरोपावरून सोमवारी राहुल गांधी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे समजून घेतले पाहिजे की, कर्नाटक निवडणूक त्यांच्यासाठी नाही. स्वत:बद्दल बोलण्याऐवजी पंतप्रधानांना कर्नाटकातील भाजप सरकारच्या कामाबद्दल बोलावे. तुम्ही (मोदी) कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारासाठी येता, पण कर्नाटकबद्दल बोलत नाही. तुम्ही तुमच्याबद्दल बोलता. तुम्ही तीन वर्षांत कर्नाटकात काय केले, ते तुम्हाला सांगावे लागेल. तुमच्या भाषणातही तुम्हाला बोलायचे आहे. पुढच्या पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात? तरुणाईसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी काय करणार आहात?’

‘ही निवडणूक तुमच्यासाठी नाही. ती कर्नाटकच्या लोकांची आणि त्यांच्या भविष्याची आहे. तुम्ही म्हणता काँग्रेसने तुम्हाला ९१ वेळा शिव्या दिल्या. पण तुम्ही कर्नाटकसाठी काय केले, याबद्दल तुम्ही कधीच बोलत नाही. पुढच्या भाषणात तुम्ही काय केले आणि पुढच्या पाच वर्षांत काय कराल याबद्दल बोला’, असे आवाहन केले.

मोदींनी शनिवारी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एम. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ‘विषारी साप’वरून काँग्रेसवर निशाणा साधला आणि आजपर्यंत पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर ९१ वेळा विविध प्रकारच्या शिव्या दिल्याचे सांगितले होते.

जेव्हा काँग्रेसचे नेते कर्नाटकात येतात आणि भाषण देतात, तेव्हा ते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांसारख्या नेत्यांबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल बोलतात. आम्ही आमच्या सर्व नेत्यांची नावे घेतो. तुम्ही (मोदी) इथे येता तुमचे मुख्यमंत्री (बसवराज बोम्मई) आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्याबद्दल कधी बोलत नाही. तुमची भाषणे केवळ स्वत:बद्दलची आहेत, असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या आश्‍वासनावर प्रकाश टाकला. २०० युनिट मोफत वीज, महिला कुटुंब प्रमुखाला २००० रुपये मासिक मदत, १० किलो तांदूळ, पदवीधरांसाठी तीन हजार रुपये आणि डिप्लोमाधारकांसाठी १५०० रुपये आणि सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास अशी आश्‍वासने आहेत. कर्नाटकात तीन वर्षात भाजपनेर मोठा भ्रष्टाचार केला. सर्व प्रकारच्या कामात ४० टक्के कमिशन घेतले जात आहे. पंतप्रधानांना या भ्रष्टाचाराची आणि ४० टक्के कमिशनची माहिती नाही, असे नाही. त्यांना सर्व काही माहिती आहे. त्यामुळे पंतप्रधानांना प्रश्न आहे की, तीन वर्षांपासून या लुटीची माहिती असूनही तुम्ही काही कारवाई केली का? का केली नाही ? याचे उत्तर तुम्ही कर्नाटकातील जनतेला द्यावे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com