बंगळूर : अनेक दिवसांनंतर, राज्यातील पाऊस (Karnataka Rain) कमी झाला आहे आणि शनिवारपासून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. रविवारीही (ता. १) किनारपट्टीच्या काही भागांत पाऊस पडला. तथापि, मंगळवारपासून (ता. ३) किनारपट्टीवर आणि ४ जूनपासून बंगळूरसह राज्याच्या काही भागांत पाऊस पुन्हा वाढेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.