लग्नमंडपातच नियतीनं कुंकू पुसलं, हार घालताच तरुणाचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

Pravin Kurne : अवघ्या २६ वर्षीय तरुणाचा लग्नाचे विधी सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं खळबळ उडाली आहे. जिथून वरात जाणार होती तिथून त्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबावर आली.
Groom Praveen collapses minutes after wedding ceremony in Karnataka
Groom Praveen collapses minutes after wedding ceremony in KarnatakaEsakal
Updated on

कर्नाटकात एका २६ वर्षीय तरुणाचा लग्नाचे विधी सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. बागलकोट तालुक्यातल्या जामखंडी शहरात शनिवारी प्रवीण कुर्ने याचा लग्नसोहळा सुरू होता. वधूला मंगळसूत्र घातल्यानंतर वधु-वर एकमेकांना हार घालण्याचा विधी सुरू होता. यावेळी प्रवीणच्या छातीत दुखायला लागलं आणि तो स्टेजवर कोसळला. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com