
Video Viral: ...अन् जखमीच्या संतप्त पत्नीने माजी मुख्यमंत्र्याच्या 'तोंडावर फेकले पैसे'
बंगळूर : कर्नाटकमधील बागलकोटमध्ये काँग्रसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर एका महिलेने मदत म्हणून दिलेले पैसे फेकले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. बागलकोट जिल्ह्यातील केरूर येथे झालेल्या हिंसाचारात काहीजण जखमी झाले होते. या हिंसाचारात जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे.
(Karnataka Women Viral Video)
दरम्यान, बागलकोट जिल्ह्यातील केरूर शहरात छेडछाडीच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. यानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जखमींना दोन लाखांची मदत जाहीर केली होती. यानंतर ते बागलकोट येथे उपचार घेत असलेल्या जखमींना भेटण्यासाठी आले होते.
यावेळी एका जखमींच्या पत्नीने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या गाडीचा ताफा अडवला होता. त्यावेळी या मुस्लिम महिलेने त्यांना पैसे परत घेण्याची मागणी केली पण सिद्धरामय्या यांनी ते अमान्य केलं आणि त्यांचा ताफा पुढे निघाला पण त्या महिलेने त्यांच्या गाडीवर पैसे फेकत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. हिंसाचारातील जखमींना मदत म्हणून दिलेली निधी ही सहानुभूती असल्याच्या विचाराने या महिलेने आमदाराच्या 'तोंडावर पैसे फेकून' मारले आहेत.
केरूर शहरात छेडछाडीच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी कलम १४४ लागू केला असून १८ लोकांना ताब्यात घेतलं आहे. अधिक तपास चालू असल्याचं पोलीस अधिक्षक एस.पी.जयप्रकाश यांनी सांगितलं आहे.
Web Title: Karnataka Women Threw Money Former Chief Ministers Face Viral Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..