कोरोनानंतर कर्नाटकात हत्ती रोगाचे थैमान; बागलकोटसह 'या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण l Lymphatic Filariasis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lymphatic Filariasis

कर्नाटकात हत्ती रोगाचे थैमान; बागलकोटसह 'या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

बेळगाव : कोरोनाचे (Corona) संकट कायम असतानाच जिल्ह्यात हत्ती रोगाने (Lymphatic Filariasis) थैमान घातले आहे. जिल्ह्यात यापूर्वी हत्ती रोगाची लागण झालेल्या ५२ रुग्णांवर उपचार सुरू असतानाच, पुन्हा २१ नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे. सर्व बाधित रुग्ण हे रामदुर्ग (Ramdurg) तालुक्यातील आहेत.

उत्तर कर्नाटकातील सीमावर्ती जिल्ह्यात हत्ती रोगाची लागण झालेले रुग्ण आढळून येते आहेत. बागलकोट, जमखंडी, विजापूर, रायचूर (Bagalkot,Jamkhandi,Vijapur,Raichur)या जिल्ह्यात रुग्ण आढळून येत आहेत. या बाधित जिल्ह्यामध्ये जाऊन आलेल्या बेळगाव (Belguam) जिल्ह्यातील लोकांना हा रोग झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर आरोग्य खात्याने लक्ष ठेवले आहे. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत.

रोगाची लक्षणे

डासाने चावा घेतल्यास हत्ती रोगाची लागण होते. वारंवार ताप येणे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. 'लिम्फॅटिर फायलेरियासिस' या डासाने चावा घेतल्यास या रोगाची बाधा होऊन पायांना सूज येते. डासाने चावा घेतल्यानंतर ६ महिन्यात रोगाचे निदान होते. त्यामुळे रुग्णांना असह्य वेदना होतात. यामुळे अपंगत्व येण्याचा धोका देखील असतो.

रक्त तपासून घेण्याचे आवाहन

परराज्यात जर कोणी जाऊन आले असेल ते त्यांनी आपले रक्त तपासून घ्यावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. रोग नियंत्रणात आणण्यासाठी यापूर्वीच चिक्कोडी, रायबाग, अथणी, रामदुर्ग सरकारी रुग्णालयात रक्त तपासणी केली जात आहे. ४ जानेवारी ते ६ पर्यंत खानापूर तालुक्यातील पारीश्वाड आणि चिक्कोडी , रामदुर्ग येथे देखील रक्त तपासणी केली जाणार आहे.

जिल्ह्यातील हत्ती रोग नियंत्रणात आणण्यासाठी उपाय योजना सुरू आहेत. रोगाचे निदान झालेल्यांवर औषध उपचार केले जात आहेत. लवकरच यावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल.

डॉ. एम. एस. पल्लेद, जिल्हा रुग्ण नियंत्रण अधिकारी.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnatakacovid 19Belguam
loading image
go to top