
अकबराच्या एका मंत्र्याने काशी विश्वनाथच्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला होता
काशी विश्वनाथ मंदिर. काशी म्हणलं की हिंदुचं पवित्र स्थळ मानलं जाणारं काशी विश्वेश्वराचं मंदिर आपल्यासमोर येतं. काशी विश्वेश्वर मंदिर आणि सध्या वादात सापडलेली ज्ञानवापी मशीद जवळजवळंच आहेत. भिंतीला भिंत म्हटलं तरी चालेल. ज्ञानवापी मशीद शिवमंदिर पाडून बांधलेली आहे असा दावा सतत केला जातो. त्यावरून सध्या वाद सुरू असून तिथे शिवलिंग सापडल्याचा दावाही सर्वेक्षणादरम्यान करण्यात आला होता. हे सगळं प्रकरण आता कोर्टात आहे. पण ज्ञानवापी मशिदीच्या जवळ असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिराचा पहिला जिर्णोद्धार हा अकबराच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याच्या मदतीने झाला होता.

काशी विश्वेश्वर मंदिर
तसं बघितलं तर ११ व्या शतकात राजा हरिश्चंद्राने काशी विश्वेश्वराचा जिर्णोद्धार केला होता असं सांगितलं जातं. त्यानंतर मुघल आक्रमकांनी ११९४ मध्ये काशी विश्वेश्वराच्या मंदिराची लूट करुन तोडफोड केली. त्यानंतर मुघल शासक सुलतान मोहम्मद याने काशी विश्वेश्वर मंदिराच्या जागेवर मशीद बांधली असा दावा केला जातो. पण यावर इतिहासकारांचे मतभेद आहेत. त्यावेळी उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. मुघल शासक जनतेवर अनन्वित आत्याचार करत असायचे त्यामुळे काशी विश्वेश्वर मंदिराची तोडफोड केल्यावरही हिंदूंना विरोध करता येत नसायचा.

काशी विश्वेश्वर मंदिर
त्यानंतर अकबराच्या दरबारातील अर्थमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या तोरडमल नावाच्या प्रशासकाने या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मदत केली होती. १८८५ मध्ये पंडित नारायण भट्ट यांनी या राजाच्या मदतीने काशी विश्वेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्याअगोदर काशीचे हे मंदिर पाडून मुघल शासक सुलतान मोहम्मद याने मशीद बांधली होती असा दावा केला जातो.
तोरडमल हा अकबराच्या दरबारातला ख्यातनाम मंत्री होता. १५६१ साली त्याने अकबराच्या दरबारात कारकून म्हणून कामाला सुरूवात केली होती. रणथंभोर, गुजरात, बिहार येथील लढायांत त्याने सेनानी म्हणून काम केले पण स्वतःच्या कामगिरीमुळे तो हळूहळू वित्तमंत्र्याच्या पदापर्यंत पोहोचला. त्याने सुरू केलेल्या महसूल पद्धतीमुळे त्याचे नाव प्रसिद्ध होते.
हेही वाचा: मल्हाररावांनी तेव्हाच ज्ञानवापी मशीद पाडली असती पण काशीच्या पुरोहितांनी...
तोरडमल या मंत्र्यांने आपल्या कामाची वेगळी शैली तयार केली होती. त्याने जमिनीचे सर्वेक्षण करून विभागणी केली व नवीन सारा बांधून दिला होता. आजच्या महसूलपद्धतीत त्याच्या पद्धतीचा काही अंश आढळतो. त्याने महसूल खात्यात हिंदीऐवजी फारसी भाषा सुरू केली. प्रामाणिक प्रशासक, उत्तम सेनानी व कट्टर स्वधर्माभिमानी म्हणूनही त्याची ख्याती होती. काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या पहिल्या जिर्णोद्धारात त्याने नारायण भट्ट यांना मदत केली होती. मुसलमानांनी तोडलेल्या विश्वनाथाच्या मंदिराचा त्यांच्याच राज्यातील एका मंत्र्याने जिर्णोद्धार केला होता.
संदर्भ - मराठी विश्वकोश
Web Title: Kashi Vishweshwar Temple Akbar Gyanvapi Mosque
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..