शाळेत एका प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं ओरडलेल्या शिक्षकांवर विद्यार्थ्यानं गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील काशीपूरमध्ये एका खासगी शाळेत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं शिक्षकाला गोळी मारलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी एका प्रश्नाचं उत्तर न दिल्यानं शिक्षक विद्यार्थ्याला ओरडले होते. विद्यार्थ्यानं जेवणाच्या डब्यात लपवून बंदूक आणली होती.