

Major Army Accident Reported In Jammu Kashmir
Esakal
जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्याती लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात किमान ४ जवानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुर्घटनेत ९ जवान गंभीर जखमी झाले आहेत. भद्रवाह-चंबा इंटरस्टेट रोडवर खन्नी टॉपजवळ ही दुर्घटना घडली. लष्कराच्या वाहनातून १७ जवान प्रवास करत होते अशी माहिती समजते.