Waqf Bil : ‘वक्फ’वरून काश्मीर विधानसभेत रणकंदन; चर्चा न करू दिल्याने आमदारांची हौद्यात उतरून घोषणाबाजी
Kashmir Assembly : वक्फ विधेयकावर चर्चा न करण्याच्या निर्णयावर विरोध करण्यासाठी काश्मीर विधानसभेत आमदारांनी गोंधळ घातला. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपीचे आमदार यामध्ये सहभागी झाले होते.
जम्मू : वक्फ विधेयकावरील चर्चेची मागणी करत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांसह काँग्रेस, पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी(पीडीपी), अपक्ष आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.