लंगटे (हंदवाडा, उत्तर काश्मीर) : हंदवाडा तालुक्यातील लंगटे गावात आज (सोमवारी) सकाळी एक भीषण घटना घडली. येथील एका जुन्या मशिदीची इमारत (Kashmir Mosque Explosion) पाडण्याच्या वेळी अचानक मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.