नवी दिल्ली/श्रीनगर - पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या कारवायांना नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर सक्रिय झाले असून दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र चालूच आहे. तर, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीमही सुरू असून त्यांच्या घरांना जमीनदोस्त करण्याची कारवाईही स्थानिक प्रशासनाने हाती घेतली आहे.