VIDEO - अंत्ययात्रा नव्हे, इथं रुग्णाला दवाखान्यात असंच न्यावं लागतं

kashmir patient
kashmir patient

दोडा - कोरोनाच्या काळात सध्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. अनेक ठिकाणी इतर आजारांवर उपचारासाठी रुग्णालये उपलब्ध नाहीत. कोरोनाशिवाय इतर आजार असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका रुग्णाला उपचारासाठी लोकांनी बांबूपासून गावातच तयार केलेल्या स्ट्रेचरवरून दवाखान्यात नेलं असल्याचं दिसतं. 

व्हिडिओ पाहताना एखाद्याची अंत्ययात्रा निघाली आहे असं वाटतं पण लोक खांद्यावरून रुग्णाला दवाखान्यात नेत आहेत. काश्मीरमधील हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे. याआधी मध्य प्रदेशातील एका महिलेला असंच लाकडी खाटेवरून दवाखान्यात नेत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात अनेक भागांमध्ये अजुनही वाहतुकीसाठी रस्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत पायीच प्रवास करावा लागतो. दोडा जिल्ह्यातील बनशाला गावातील एका रुग्णाला दवाखान्यात घेऊन जात असलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी याबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलं. तसंच रस्त्याची सोय व्हावी यासाठी लक्ष घालू असं आश्वासनही दिलं आहे. 

दोडा जिल्ह्यातील लोकांसाठी हे चित्र नेहमीचं आहे. याआधीही गेल्या महिन्यात असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. लोकांनी तयार केलेल्या स्ट्रेचरला पालखी असंही म्हणतात. रस्ता अर्धवट असल्यानं गाडीने प्रवास करणं शक्य होतं नाही. रस्त्याच्या कामासाठी वनविभागाचा अडथळा आहे. तसंच न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या काही प्रकरणांमुळे पुढचे काम अडल्याचं अतिरिक्त जिल्हाअधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com