जेसीबी चालकाचे होतेय कौतुक; व्हिडिओ पाहाच...

वृत्तसंस्था
Thursday, 13 August 2020

पाण्यात मोटार अडकल्यानंतर तिघेजण मोटारीच्या टपावर जाऊन बसले. पण, पाण्याचा वेग वाढू लागल्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यांच्या मदतीला जेसीबी धावून आला आणि तिघांचा जीव वाचला.

बिलासपूर (छत्तीसगड): पाण्यात मोटार अडकल्यानंतर तिघेजण मोटारीच्या टपावर जाऊन बसले. पण, पाण्याचा वेग वाढू लागल्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यांच्या मदतीला जेसीबी धावून आला आणि तिघांचा जीव वाचला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेसीबी चालकाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Video: पाण्यात अडकलेल्या बसला जेसीबीने काढले बाहेर...

आयपीएस अधिकार दिपांशू काबरा यांनी संबंधित व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पाण्यामध्ये एक मोटार अडकली. मोटारीमधून तिघे जण बाहेर येऊन टपावर जाऊन बसले. पण, पाण्याने त्यांना वेढले आणि पाण्याचा वेगही वाढू लागला. जीव वाचवण्यासाठी या तिघांची धडपड सुरू झाली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाला. तिघांना वाचविण्यासाठी त्यांनी जेसीबी मागवला. जेसीबी चालक प्रसंगावदान राखत वेगात आला. जेसीबीचा पुढचा भाग पॉकलँडमध्ये तिघांनाही अलगद उचलून पुराच्या पाण्यातून बाहेर काढत जीव वाचवला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेसीबी चालकाचे नेटिझन्स कौतुक करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jcb rescued 3 people trapped in the flood video viral