
Kashmir Terrorists
Sakal
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी आता स्थानिकांच्या घरांमध्ये, ‘आउट हाउस’मध्ये आश्रय घेण्याऐवजी दाट जंगलांच्या आत खोलवर आणि उंच टेकड्यांवर भूमिगत बंकर बांधण्यास सुरुवात केली आहे, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. दहशतवादी कारवायांसाठी स्थानिक पाठिंबा कमी होत चालल्यामुळे डावपेचात हा बदल झाला असून, सुरक्षा दलांसाठी हे नवे आव्हान उभे ठाकले आहे.