esakal | Article 370 : काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही : पंतप्रधान
sakal

बोलून बातमी शोधा

Article 370 : काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही : पंतप्रधान

- काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू सुधारेल.

- परिस्थिती सुधारल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार

- काश्मीर पुन्हा एक राज्य होईल.

Article 370 : काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही : पंतप्रधान

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू सुधारेल. येथील परिस्थिती सुधारल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही. काश्मीर पुन्हा एक राज्य होईल. काश्मीरमधील नागरिकांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, की काश्मीरमधील नागरिकांना आता सर्व हक्क मिळणार आहेत. काश्मीरमध्ये बदल होऊ शकतो. काश्मीर हा आपल्या देशाचा मुकूट आहे. यासाठी अनेक जवानांनी बलिदान दिले आहे. काश्मिरी जनता फुटीरतावाद्यांना पराभूत करेल, असा मला विश्वास आहे. क्रीडा क्षेत्रात मोठी संधी आहे. दहशतवाद आणि फुटीरतावाद्यांना नायनाट केला पाहिजे. काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना मिळेल. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी काश्मीरमध्ये यावे. काश्मीरमध्ये एम्स, आयआयएम, आयआयटी येतील. काश्मीरचे नेतृत्व आता तरुणांकडे आहे. जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील. या निवडणुकीतून तरुण समोर येतील आणि प्रतिनिधित्व करतील. 

काश्मीरमधील तरुणवर्ग आतापर्यंत सुविधांपासून वंचित होता. पण, आता त्यांना सर्व सोईसुविधा मिळतील. काश्मीरमध्ये आरक्षण नव्हते, ते मिळणार आहे. भारताच्या या प्रमुख भागात शांतता निर्माण झाल्यानंतर विकासास प्राधान्य मिळेल. काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांनी मिळून भारताच्या विकासात हातभार लावावा, असे मोदींनी सांगितले.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काश्मीरमधील हे कलम हटविण्यात आले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. देशभरात सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मोदींनी याविषयी प्रथमच सार्वजनिक भाषण करत देशाला उद्देशून भाषण केले.

loading image