Kedarnath's Panchmukhi ceremonial palanquin arrives at Omkareshwar Temple in Ukhimath for winter worship
esakal
केदारनाथ: अकरावे ज्योतिर्लिंग भगवान केदारनाथ यांची पंचमुखी चल विग्रह उत्सव डोली शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) ऊखीमठ येथील श्री ओंकारेश्वर मंदिरात दाखल झाली. तीन दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनुसार बाबा केदार शीतकालीन गद्दीस्थळी विराजमान झाले. त्यामुळे आता पुढील सहा महिने भाविकांना ऊखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात भगवान केदारनाथांचे दर्शन घेता येणार आहे.