रुद्रप्रयाग (उत्तराखंड) : केदारनाथ यात्रेच्या मार्गावर मोठी दुर्घटना (Kedarnath landslide) घडली आहे. गौरीकुंड ते केदारनाथ पायी मार्गावरील जंगलछट्टी परिसरात दरड कोसळल्यामुळे पाच प्रवासी खोल दरीत पडले, त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असून जखमींवर तातडीने उपचार केले जात आहेत.