

Kedarnath Travel Update Yatra Resumes After Rain Check Road Conditions Route Status and Safety Guidelines
esakal
रुद्रप्रयाग: मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे गुरुवारी सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आलेली केदारनाथ यात्रा शुक्रवारी पुन्हा सुरू करण्यात आली. हवामानात सुधारणा झाल्यानंतर प्रशासनाने मार्गाची पाहणी केली आणि सकाळी सुमारे ८ वाजता सोनप्रयाग येथून टप्प्याटप्प्याने सुमारे ८०० भाविकांना केदारनाथकडे रवाना केले.