प्लाझ्मा दान करण्याचे केजरीवालांचे पुन्हा आवाहन 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जुलै 2020

दिल्लीत जुलैअखेर साडेपाच लाख कोरोनाग्रस्त असतील,असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्यावर लोकांमध्ये मोठी घबराट पसरली,अशी नाराजी गृहमंत्री यांनी करत दिल्लीतील कोरोना निर्मूलनाची सूत्रे घेतली होती.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत जुलैच्या सुरवातीलाच कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बरे झालेल्या कोरोना रूग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावे असे पुन्हा आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दिल्लीत जुलैअखेर साडेपाच लाख कोरोनाग्रस्त असतील, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितल्यावर लोकांमध्ये मोठी घबराट पसरली, अशी नाराजी गृहमंत्री अमित शहा यांनी करत दिल्लीतील कोरोना निर्मूलनाची सूत्रे घेतली होती. आता जुलैच्या सुरवातीलाच कोरोनाग्रस्तांचा आकडा एक लाखांच्या वर गेल्यावर सिसोदिया यांच्या आशंकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत लक्षणे न दिसणारे रूग्ण प्रचंड मोठ्या संख्येने असल्याचे वारंवार सांगितले जाते. केजरीवाल यांनी मात्र, नागरिकांनी रूग्णसंख्येच्या आकड्याने घाबरून जाऊ नये कारण यातील ७२,००० लोक बरे झाले आहेत, असा दावा केला आहे. ते म्हणाले की २५ हजार सक्रिय रूग्णांपैकी १५,००० रूग्णांवर घरातच उपचार सुरू आहेत. मृत्यूदरही कमी झाला आहे. जोवर कोरोनावर लस येत नाही तोवर प्लाझ्मा पद्धतीचाच मोठा आधार असणार आहे. त्यामुळे देशातील पहिल्या प्लाझ्मा बॅंकेत भर घालण्यासाठी दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने पुढे यावे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुलैत दर १०० लोकांमागे केवळ ११ कोरोनाग्रस्त आढळत आहेत. जूनमध्ये हीच संख्या १०० मागे ३१ होती. रोज २०००० ते २४००० चाचण्या होत आहेत. रूग्णालयांत सध्या ५१०० रूग्ण असून १०,००० खाटा अजूनही रिक्त आहेत, असे केजरीवाल म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kejriwal again appeals to donate plasma