दिल्लीत प्लाझ्मा बँक उभारणार; कोरोना रुग्णांवर उपचारासाठी केजरीवाल यांची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जून 2020

दिल्लीत केंद्र सरकारने सूत्रे हाती घेऊनही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे.मागच्या २४ तासांमध्ये तीन हजारांपर्यंत नवे रुग्ण दाखल झाले आणि राजधानीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ८३ हजारांच्या पुढे पोचली.

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानीतील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी प्लाझ्मा बँक तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी जाहीर केला. दिल्ली सरकार पुढच्या दोन दिवसांमध्येच या बँकेचे कामकाज सुरू करेल, अशी घोषणा त्यांनी केली.

लोकनायक जयप्रकाश नारायण कोरोना रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर असीम गुप्ता यांचे कोरोनामुळे निधन झाले. लॉकडाउनच्या काळात सातत्याने अतिदक्षता विभागात कार्यरत असलेल्या डॉ. गुप्ता यांना ३ जून रोजी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या निधनानंतर दिल्ली सरकारने प्लाझ्मा बँक स्थापनेस गती दिली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन त्यांच्यावरही प्लाझ्मा उपचार यशस्वी ठरले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘प्लाझ्मा दान करा’ 
दिवंगत डॉ. गुप्ता यांच्यासारख्यांच्या सेवावृत्तीमुळेच आम्ही सारे कोरोनाशी लढत आहोत, असे सांगून केजरीवाल यांनी बरे झालेल्या कोरोनाग्रस्तांनी इतरांचा जीव वाचविण्यासाठी आपला प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन केले.

दिल्लीत केंद्र सरकारने सूत्रे हाती घेऊनही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. मागच्या २४ तासांमध्ये तीन हजारांपर्यंत नवे रुग्ण दाखल झाले आणि राजधानीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ८३ हजारांच्या पुढे पोचली. तर, ५२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांनी प्लाझ्मा दान करावा, यासाठी प्रस्तावित प्लाझ्मा बँकेचे सर्व सरकारी रुग्णालयांत विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. दिल्लीत नव्याने १४१ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रस्तावित प्लाझ्मा बँकेमुळे कोरोना उपचारांना वेग येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हरियानातही प्लाझ्मा उपचार
दिल्लीपाठोपाठ हरियाना सरकारनेही वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) परवानगीनंतर प्लाझ्मा उपचार पद्धती सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय आज घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kejriwal announce to set up plasma bank in Delhi for treatment corona patients