'राफेल'ची फाईल मला द्या, मी 'त्यांना' तुरुंगात पाठवेन : केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

''दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार हे मागील 70 वर्षांतील सर्वांत प्रामाणिक सरकार आहे. लोकसहभागातून प्रामाणिक राजकारण कसे करावे, याचा उत्तम उदाहरण 'आप'ने दाखवून दिले आहे''.

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली 

नवी दिल्ली : ''केंद्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीने 'आम आदमी पक्ष' (आप) सरकारच्या 400 फाईल तपासल्या आहेत. आता त्याऐवजी माझ्याकडे राफेल कराराची फाईल फक्त चार दिवसांसाठी द्या, मी 'त्यांना' जन्मभरासाठी तुरुंगात पाठवेन'', असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) केले. 

आम आदमी पक्षाच्या 'आप का दान, राष्ट्र का निर्माण' या डोनेशन कॅम्पेनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ''प्रामाणिक सरकारच्या अभिमानामुळे आता दिल्लीच्या नागरिकांची छाती 56 इंच नाही तर 60 इंचाने फुलली आहे. केंद्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीने आप सरकारच्या 400 फाईल तपासल्या आहेत. आता त्याऐवजी माझ्याकडे राफेल करारासह चार फाईली फक्त चार दिवसांसाठी द्या, मी त्यांना जन्मभरासाठी तुरुंगात पाठवेन''.

दरम्यान, दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार हे मागील 70 वर्षांतील सर्वांत प्रामाणिक सरकार आहे. लोकसहभागातून प्रामाणिक राजकारण कसे करावे, याचा उत्तम उदाहरण 'आप'ने दाखवून दिले आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kejriwal Challenges Centre to show him Rafale deal file