
नवी दिल्ली : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील नागरिकांना दररोज दूषणे देत आहेत, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत जनता त्याला सडेतोड उत्तर देईल,’’ असे आप नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले. ‘‘मोदी यांनी रोहिणीमध्ये ३८ मिनिटांचे भाषण केले, यातील २९ मिनिटे त्यांनी दूषणे दिली,’’ असेही केजरीवाल म्हणाले.