पर्रिकरांना केजरीवालांकडून आमंत्रण, म्हणाले... 'वापरा आणि फेकून...'

Arvind kejriwal
Arvind kejriwalTeam eSakal

पणजी : गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) याला या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट न दिल्याने गोव्यातील राजकारण तापलं आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता गोव्यात आपली प्रतिष्ठा पणाला लावलेले अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी उत्पल पर्रिकरांना एक आवाहन केलंय. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, उत्पल पर्रिकर यांचं आम आदमी पक्षामध्ये (Aam Aadmi Party) स्वागत आहे. जर ते आपच्या तिकीटावर विधानसभा लढवत असतील तर त्यांचं स्वागतच असेल. (Goa Assembly Election 2022)

Arvind kejriwal
भाजपकडून उत्पल पर्रीकरांचा गेम? पणजीतून तिकीट नाकारले

अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय की, भाजपने पर्रीकर कुटुंबालाही 'वापरा आणि फेकून देण्याचेच धोरण अवलंबिल्याचे गोवावासीयांना फार वाईट वाटलेलं आहे. मनोहर पर्रीकरजींचा मी नेहमीच आदर केला आहे. आम आदमी पक्षामध्ये सामील होण्यासाठी आणि आपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी उत्पलजींचं स्वागत आहे, असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) उमेदवारांची 38 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचे नाव नाही. विशेष म्हणजे ज्या पणजी मतदारसंघासाठी उत्पल पर्रीकर इच्छूक होते, त्याठिकाणी आमदार राजेश पाडनेकर यांनाच भाजपने संधी दिली आहे. यामुळे भाजप उत्पल पर्रीकरांना डावलल्याची चर्चा होत आहे.

Arvind kejriwal
UP Election : भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद CM योगींविरोधात लढणार

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजी मतदारसंघातून (Panaji constituency) लढण्याची भुमिका मांडली होती. काहीही झाले तरी आपण पणजीतूनच लढणार असल्याचं त्यांनी म्हटले होते. भाजपने तिकीट नाकारल्यास आपण पणजीतून अपक्ष लढू असंही त्यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com