esakal | केरळ, महाराष्ट्रात ६५ टक्के रुग्ण;देशातील सक्रिय कोरोना रुग्णांत आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

केरळमध्ये ३९.७% म्हणजे ७३, १२१ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत २५ टक्के म्हणजे ४६,०५७ सक्रिय रुग्ण आहेत.सोमवारी सकाळी आठपर्यंत देशात १६ लाख १५ हजार ५०४ जणांनी कोरोनाची लस घेतली होती.

केरळ, महाराष्ट्रात ६५ टक्के रुग्ण;देशातील सक्रिय कोरोना रुग्णांत आघाडी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये केरळ व महाराष्ट्र या दोनच राज्यांचे ६५ टक्के रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिली. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन सोमवारी १ लाख ८४ हजार १८२ झाली. एकूण रुग्णसंख्येतील सक्रिय रुग्णांची टक्केवारीही आणखी घटून १.७३ वर आली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केरळमध्ये ३९.७% म्हणजे ७३, १२१ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत २५ टक्के म्हणजे ४६,०५७ सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी (ता. २५) सकाळी आठपर्यंत देशात १६ लाख १५ हजार ५०४ जणांनी कोरोनाची लस घेतली होती. गेल्या २४ तासांत ६९४ सत्रांत ३३, ३०३ जणांनी लस घेतली. लसीकणाची आत्तापर्यंत २८,६१४ सत्रे पूर्ण झाली आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णांतील दरी वाढली 
देशात कोरोनाच्या सक्रिय व बऱ्या झालेल्या रुग्णांतील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, देशाचा कोरोनातून बरे होण्याचा दरही ९६.८३ टक्क्यांवर पोचला आहे. गेल्या २४ तासांत केरळमध्येच सर्वाधिक म्हणजे ५,१७३ रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात याच काळात १,७४३ जणांनी कोरोनावर मात केली.