
एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो अंगणवाडीत अंडा बिर्याणी आणि पुलावची मागणी करत होता. त्याची मागणी सरकारपर्यंत पोहोचली असून आता अंगणवाडीतील मुलांना अंडी बिर्याणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. केरळमधील सरकारने मुलाचे वजन आणि मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.