Kerala : सोने तस्करीला मुख्यमंत्र्यांचे संरक्षण : राज्यपाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kerala Governor CM dispute Gold Smuggling Protection

Kerala : सोने तस्करीला मुख्यमंत्र्यांचे संरक्षण : राज्यपाल

तिरुअनंतपुरम : केरळचे राज्यपाल अरिफ मोहंमद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यातील वाद गुरुवारी पराकोटीला पोहोचला आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीत राज्यपालांद्वारे राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप खान यांनी फेटाळून लावला आहे. उलट राज्यातील सोने तस्करीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप प्रथमच केला.

कुलगुरूंच्या नियुक्तीत हस्तक्षेप करीत असल्याचे पुरावे पिनराई यांनी द्यावेत, अथवा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान राज्यपालांनी दिले. कुलगुरू निवडीत हस्तक्षेप करीत असल्याचा एक जरी पुरावा मिळाला तरी राज्यपालपद सोडण्याची तयारी खान यांनी दाखविली. राज्यपालांनी मुख्यमंत्री कार्यालयावर टीका केली.

‘‘सोने तस्करीत मुख्यमंत्री कार्यालयाचा हात असेल तर सरकार तपास यंत्रणांना त्रास देत होत असल्याचे राज्यपाल या नात्याने मी सांगू शकेन,’’ असे खान यांनी सांगितले. या प्रकरणात मी कधी हस्तक्षेप केला नाही. पण सोने तस्करीला मुख्यमंत्री कार्यालयातून संरक्षण मिळत असल्याचे मी पाहत आहे. ‘सीएमओ’तील व्यक्ती त्यांच्या अपात्र व अयोग्य नातेवाइकांच्या नियुक्तीसाठी कन्नूरच्या कुलगुरूंना आदेश देत आहेत. मी याची दखल घेतली नाही. पण जर राज्य सरकार, ‘सीएमओ’ किंवा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे लोक तस्करीत सहभागी असतील तर यात हस्तक्षेप करण्याची मला संधी आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या लोकांची नियुक्ती करण्यासाठी मी कुलगुरूंविरुद्ध कारवाई करीत असल्याचा आरोप डावे सरकार आणि मुख्यमंत्री करीत आहेत. जर माझ्या अधिकारात ‘आरएसएस’च्या एका व्यक्तीची जरी मी कुलगुरूपदी नियुक्ती केली, हे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे. पण जर पुरावे नसतील, तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची पिनराई विजयन यांची तयारी आहे का?’’

- अरिफ मोहंमद खान, राज्यपाल, केरळ