Kerala High Court Judge on ED Summons: 'ईडीने समन्स दिल्यास मलाही जावे लागेल', उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलं मोठं वक्तव्य

Kerala High Court Judge on ED Summons: ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या समन्सबाबत केरळ उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे.
Kerala High Court Judge on ED Summons
Kerala High Court Judge on ED SummonsEsakal

Kerala High Court Judge on ED Summons: ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या समन्सबाबत केरळ उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, तपास यंत्रणांनी एखाद्याला समन्स पाठवले तर त्याला हजर राहणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे याआधी सुप्रीम कोर्टानेही ईडीच्या समन्सचा आदर करा असं म्हटलं आहे.

न्यायमूर्ती देवन रामचंद्रन या याचिकेवर सुनावणी करत होते. बार आणि बेंचच्या अहवालानुसार, त्यांनी सांगितले की, त्यांच्या मते, एखादी व्यक्ती कोणत्याही पदावर असली तरीही, जर ईडीने त्यांना समन्स बजावले असेल तर त्यांनी जावे, ईडीला सहकार्य करावे. ते म्हणाले, 'कृपया ईडीला सहकार्य करा. ते तुमच्यावर जी कारवाई करतात त्यावर मी नियंत्रण ठेवीन. ईडीसमोर हजर व्हा आणि परत या. मी तुम्हाला मदत करीन.'

Kerala High Court Judge on ED Summons
Death Threat to PM Modi: इंग्लंडमधून आलेल्या फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; काय आहे प्रकरण

ते पुढे म्हणाले, 'पण समन्सपासून पळू नका. हे केवळ या प्रकरणाबद्दल नाही तर हे माझे मत आहे. तपास अधिकारी समन्स पाठवतात तेव्हा आपण त्यांच्यापासून सुटू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. आपण सर्व नागरिक आहोत. ईडीने मला समन्स पाठवले तर मलाही जावे लागेल. कोणीही कोणाच्या वर नाही. कृपया समन्सला प्रतिसाद द्या असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

Kerala High Court Judge on ED Summons
Arun Goel Resigns: निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकांचे अधिकार सरकारला नको; काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

काय आहे प्रकरण?

रिपोर्टनुसार, 'वेबमेप ट्रेडर्स' ही ई-कॉमर्स कंपनी चालवणाऱ्या प्रशांत पी नायर यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांची कंपनी 2020 पासून 'हायरिच ऑनलाइन शॉपी' ला अकाउंटिंग कन्सल्टन्सी सेवा पुरवत होती. दोन कंपन्यांमध्ये मोठे व्यवहार झाले, परंतु ऑगस्ट 2022 मध्ये कराराचे नूतनीकरण न झाल्यामुळे व्यवहार थांबले.

Kerala High Court Judge on ED Summons
Electoral Bonds: सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला मोठा दणका! उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची सर्व माहिती देण्याचे आदेश

यानंतर हायरिचची ईडीने चौकशी सुरू केली आणि नायरची बँक खाती गोठवली आणि त्यांना समन्सही बजावण्यात आले. त्यानंतर नायर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बँक खाती पूर्ववत करण्याची मागणी केली होती. ईडीच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, नायर यांना समन्स बजावण्यात आले तेव्हा त्यांनी हजर राहण्याबाबत अस्वस्थता व्यक्त केली.

गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या संमतीने नायर यांना १२ मार्च रोजी तपास यंत्रणेसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तसेच यासंदर्भातील अहवाल 19 मार्चपर्यंत न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com