Mercedes Accident १७ वर्षांच्या मुलाची जामिनावर सुटका, आता न्यायाधीश वडिलांवर गुन्हा दाखल करण्यास हायकोर्टाची परवानगी

Kerala Mercedes Accident Case केरळमध्ये न्यायाधीशांच्या १७ वर्षीय मुलाला मर्सिडीज अपघात प्रकरणी जामिन मंजूर झाला होता. पण मृताच्या कुटुंबियांनी आंदोलन करताच त्याला पुन्हा ताब्यात घेतलं आहे.
Kerala Mercedes Accident Case

Kerala Mercedes Accident Case

Esakal

Updated on: 

केरळमध्ये न्यायाधीशांच्या १७ वर्षीय मुलाने मर्सिडीज भरधाव चालवत दुचाकीला धडक दिली होती. यात ५५ वर्षीय दुकानदाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. पण त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आलंय. दुसरीकडे न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल करण्यास केरळ हायकोर्टाने परवानगी दिली आहे. एर्नाकुलममधील चेन्नालूर इथं ही घटना घडली होती. पोलिसांनी न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने प्रशासकीय पातळीवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com