Swinging Restaurant Incident
ESakal
देश
Swinging Restaurant Incident: १२० फूट उंचीवरील 'झुलत्या रेस्टॉरंट'मध्ये तांत्रिक बिघाड; अनेक लोक हवेत अडकले, नेमकं काय घडलं?
Kerala Swinging Restaurant Incident: केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील एका स्विंगिंग रेस्टॉरंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे काही लोक हवेत अडकले.
मनोरंजन क्षेत्र अनेकदा जीवघेणे ठरू शकते. अशीच एक घटना केरळच्या इडुक्की जिल्ह्यात घडली. जिथे एका "स्विंगिंग" रेस्टॉरंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे १६ लोक हवेत अडकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक सुमारे दीड तास थांबले होते. त्यांचे प्राण मोठ्या कष्टाने वाचविण्यात आले.

