Accident: केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू तर 38 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident: केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू तर 38 जण जखमी

Accident: केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू तर 38 जण जखमी

केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 38 जण जखमी झाले आहेत. पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरीमध्ये ही दुर्घटना घडली असून दोन भरधाव बसची समोरासमोर धडक झाली. बस एर्नाकुलमच्या मुलंथुरुथीमधील बेसलियस स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र पलक्कड जिल्ह्याच्या वडक्कनचेरी इथं केएसआरटीसीच्या बसला धडकली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बसने KSRTC बसला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर बस दलदलीमध्ये कोसळली. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना 38 रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मृतांमध्ये केएसआरटीसी बसमधील तीन तर पर्यटकांच्या बसमधील 6 प्रवाशांचा समावेश आहे. सहा पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली आहे.पोलिस घटनेचा आधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Keralaschoolbus accident