Kerala Dog : शवागराबाहेर चार महिन्यांपासून मालकाची वाट पाहतोय 'चार्ली'; हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

कन्नूर येथील जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने याबाबत एएनआयला माहिती दिली आहे.
Kerala Dog viral Video
Kerala Dog viral VideoeSakal

श्वानाला मानवाचा खरा मित्र म्हणतात. प्रामाणिकपणा आणि इमानदारी श्वानाकडून शिकावी, असंही आपण पहिल्यापासून ऐकत आलो आहोत. केरळमधील एका श्वानाने याचीच प्रचिती दिली आहे. हा श्वान गेल्या चार महिन्यांपासून एका रुग्णालयाच्या शवागराबाहेर आपल्या मालकाची वाट पाहत आहे. मात्र, आपला मालक आता परत येणार नाही, याची त्याला माहितीच नाही. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

कन्नूर येथील जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने याबाबत एएनआयला माहिती दिली आहे. "चार महिन्यांपूर्वी एक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याच्यासोबत त्याचा पाळीव श्वानदेखील आला होता. या रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाला शवागरात हलवण्यात आलं. यावेळी शवागराच्या दारापर्यंत हा श्वानदेखील सोबत आला."

"तेव्हापासून हा श्वान इथून परत जाण्याचं नाव घेत नाहीये. त्याला वाटतंय की आपला मालक आतच आहे, आणि तो कधीतरी बाहेर येईल. गेल्या चार महिन्यांपासून हा श्वान इथेच राहत आहे. त्याला इथून हाकलण्याचा प्रयत्न केला तरी तो परत येतो, मात्र ही जागा सोडत नाहीये." असं या कर्मचाऱ्याने सांगितलं.

सध्याच्या काळात जिथे मुलं आपल्या आई-वडिलांना विसरुन जातात, सख्खी भावंडं देखील एकमेकांच्या जिवावर उठतात; तिथे आपल्या मालकाप्रती असणारं एका श्वानाचं प्रेम हे चर्चेचा विषय ठरत आहे. नेटिझन्स या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

Kerala Dog viral Video
Aadhaar Card for Stray Dogs : मुंबई विमानतळावरील २० भटक्या श्वानांना मिळालं 'आधार कार्ड'; क्यूआर कोडने पटणार ओळख

नेटकऱ्यांना आली हाचिको अन् चार्लीची आठवण

या श्वानाची स्टोरी पाहून नेटकऱ्यांना '777 चार्ली' या चित्रपटाची आठवण होत आहे. यामध्ये देखील एका सीनमध्ये आपल्या मालकाला रुग्णवाहिकेतून नेत असल्याचं पाहून 'चार्ली' श्वान त्यामागे रुग्णालयापर्यंत धावत जाते.

यासोबतच जपानमधील हाचिको या श्वानाचा उल्लेखही काही कमेंट्समध्ये दिसून येत आहे. जपानमध्ये शिबुया स्टेशनवर आपल्या मालकाची वाट पाहणारा आणि तिथेच प्राण सोडणारा हाचिको श्वानही भरपूर प्रसिद्ध आहे. शिबुया स्टेशनवर त्याच्या स्मरणार्थ त्याचा एक पुतळाही उभारण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com