''परपुरुषांसोबत संबंध ठेवण्यास सांगितलं, अश्लील व्हिडिओ कुटुंबीयांना पाठविण्याची धमकी दिली'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kerala Wife Swapping Racket

Wife swapping case : प्रेमविवाह केला, पण पतीने दिला दगा! महिलेने मांडली व्यथा

''दोघांचाही प्रेमविवाह झाला. त्यानंतर पतीला आखाती देशात नोकरीही लागली. तिथून परतल्यानंतर त्यानं इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास सांगितले. पण, नकार दिल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नाहीतर लैंगिक संबंधाचे व्हिडिओ कुटुंबीयांना पाठविण्याची धमकी दिली.'' ही व्यथा आहे शारीरिक संबंधांसाठी पत्नीची अदलाबदली (Kerala Wife Swapping Racket) करणाऱ्या रॅकेटमधील एका २७ वर्षीय पीडितेची.

मूळची केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील करुकाचल येथील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय पीडितेने सुरुवातील एका व्लॉगरला तिची व्यथा बोलून दाखवली. तिने पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. तसेच पीडितेच्या भावाला देखील या घटनेबाबत माहिती झालं. त्यानंतर तिला पोलिसांत जाण्यास सांगितले. त्यानंतर तिने ८ जानेवारीला स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली. पतीच्या संमतीने इतर पुरुषांनी तिचं कसं लैंगिक शोषण केलं? याची व्यथा तिनं पोलिसांना सांगितलं. तसेच तिने तक्रारीत ९ लोकांची नावे आणि फोन नंबर देखील दिले होते. त्यानुसार केरळ पोलिसांनी ९ जानेवारीला कोट्टायममध्ये शारीरिक संबंधांसाठी जोडीदाराची अदलाबदली करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये पाच हजार जोडप्यांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

रॅकेटबद्दल माहिती मिळाली अन् संसार उद्धवस्त झाला -

''दोघांनीही प्रेमविवाह केला होता. त्यानंतर पतीला आखाती देशात नोकरी लागली. योगायोगाने त्यांना दोन लहान मुलेही आहेत. आखाती देशात राहताना, पतीला पत्नीच्या अदलाबदलीबद्दलच्या रॅकेटची माहिती मिळाली. परत आल्यावर त्याने पत्नीला या रॅकेटशी जोडण्यास भाग पाडले. सुरुवातीला तिने नकार दिला. पण त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तिने होकार दिला आणि त्यांची इतर जोडप्यांशी ओळख झाली. नंतर, जेव्हा तिने इतर पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला, तेव्हा त्याने तिच्या इतरांसोबतच्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ कुटुंबातील सदस्यांना पाठवण्याची धमकी दिली,” असं वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं. याबाबत इंडिया टुडेनं वृत्त दिलं आहे.

NRI, व्यावसायिकांचा समावेश -

अटक करण्यात आलेले लोक कोट्टायम, पठाणमथिट्टा आणि अलप्पुझा जिल्ह्यातील असून त्यात पीडितेच्या पतीचा समावेश आहे. पोलिसांनी चौकशी केली असता या सेक्स रॅकेटमध्ये सरकारी नोकर, व्यावसायिक आणि एनआरआय, व्यावसायिकांचा समावेश आहे. या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमुळे सध्या केरळ हादरलं आहे. दरम्यान, पोलिस तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आणखी तिघांचा शोध घेत आहेत.

१४ सोशल मीडिया ग्रुप्सवरून व्हायची जोडीदाराची अदलाबदली -

आरोपींचे कॉल डिटेल्स आणि चॅट्सवरून तब्बल १४ सोशल मीडियावर ग्रुपवरून हा धंदा चालत असल्याचं समोर आलं आहे. हे आरोपी पत्नीची अदलाबदली करू इच्छिणाऱ्या लोकांना हेरायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. ‘मीट अप केरळ’, ‘कपल मीट’, ‘केरळ ककल्ड’, ‘रिअल मीट’ आदी ग्रुप सोशल मीडियावर सक्रीय असून येथून जोडीदाराची अदलाबदली केली जात होती. ज्यांना इच्छा आहे त्यांचे फोटो या ग्रुपमध्ये शेअर केले जात होते. त्यानंतर जोडीदाराची बोली लावली जात होती, असा खुलासा एका पोलिस अधिकाऱ्याने केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Keralacrime
loading image
go to top