esakal | Kerla: खुनासाठी सापाचा वापर करणाऱ्या पतीस जन्मठेप
sakal

बोलून बातमी शोधा

जन्मठेप

तिरुअनंतपुरम : खुनासाठी सापाचा वापर करणाऱ्या पतीस जन्मठेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिरुअनंतपुरम : विषारी सापाच्या चाव्याने पत्नीचा खून करणाऱ्या सूरज एस. कुमार (वय २८) दुहेरी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. याशिवाय विषप्रयोगासाठी दहा वर्षे व पुरावे नष्ट करण्याबद्दल सात वर्षे कारागृहाची शिक्षाही त्याला दिली. या सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

मुलाच्या पालनपोषणासाठी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश कोल्लम जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी (ता.१३) दिले. हा अघोरी प्रकार मे महिन्यात उडकीस आला. हुंड्याचा तगादा लावून कोब्राच्या जातीच्या सापाच्या चाव्याने पत्नीचा खून करण्याचा अत्यंत भयानक कट सूरजने रचला होता. उथरा (वय २५) झोपल्यानंतर सूरजने तिच्या अंगावर कोब्रा सोडला. पहिल्या चाव्यानंतर पत्नीचा मृत्यू न झाल्याने सूरजने दुसऱ्या वेळी त्याने व्हायपर जातीच्या लहान विषारी सापाचा वापर केला. सात मे रोजी उथरा तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

साप चावून तिचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. सूरजने आधी तिला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. उथरचा मृत्यू झाल्यानंतरही तो सामान्यपणे वागत असल्याने पोलिसांनी संशयावरून सूरजला अटक केली.

शिक्षेबद्दल असमाधान

जन्मठेपेच्या शिक्षेबद्दल समाधानी नसल्याचे उथराच्या आईने सांगितले. सूरजला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल अशी अपेक्षा होती, असे त्या म्हणाल्या. संपत्तीवर ताबा मिळविल्यावर पत्नीला संपविण्याचा सूरजचा डाव होता. यासाठी त्याने गारुड्याकडून साप विकत घेतला होता. सापाला हाताळण्याचे प्रशिक्षणही त्याने घेतले होते. साप चावून पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला पण, तो फसला.

loading image
go to top